श्री गणेश विठ्ठल मंदिर ट्रस्ट अवंती नगर येथे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, एक फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर : प्रतिनिधी
अवंती नगर येथील श्री गणेश विठ्ठल मंदिर ट्रस्ट व भजनी मंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती निमित्त 29 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत सकाळी आठ ते साडेदहा दरम्यान श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सुरू करण्यात आले आहे. हरिभक्त परायणकार जगदीश माऊली घाटे यांच्या मार्गदर्शनातून पारायण सुरू आहे.
याच प्रमाणे एक फेब्रुवारी शनिवारी सकाळी सात वाजता श्री गणरायास महा अभिषेक, त्यानंतर नऊ ते दहा पर्यंत अथर्वशीर्ष पठण, दहा ते बारा संगीत भजनाचा कार्यक्रम, बारा वाजता गुलाल आणि पाळणा होऊन महाआरती होणार आहे. त्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री गणेश विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रसाळे यांनी दिली.
यावेळी गणेश भक्तांनी 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गुलाल पाळणा महाआरजीत उपस्थित राहून महाप्रसादाचे लाभ घ्यावे असे आवाहन श्री गणेश विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रसाळे, नंदू चव्हाण, राजू जवंजाळ, माऊली घाटे, नंदकुमार पवार, श्याम गोटे, अण्णाराव पाटील, सूर्यकांत धोत्रे, बाळासाहेब गोचडे, श्रीकांत रंगदाळ, बंडू पवार, यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भजनी मंडळाचे सदस्य आणि ट्रस्टी सदस्य, गणेशभक्त परिश्रम घेत आहेत.