सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेता म्हणून निवड होताच सोलापुरात जल्लोष
फटाके फोडून, मिठाई वाटत, ढोल तश्याच्या गजरात भाजपचा जल्लोष

सोलापूर : प्रतिनिधी
विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच सोलापुरात भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आलाय. विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
सोलापुरातील भाजपा कार्यालयाजवळ जमून भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, एकमेकांना मिठाई भरवून ढोल तश्याच्या गजरात ठेका धरत जल्लोष केलाय. उद्या देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील आणि राज्यात राहिलेली विकास कामे मार्गी लावतील असा विश्वास या निमित्ताने भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.
या वेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी माजी नगरसेविका नगरसेवक पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी महिला संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.