ईव्हीएम हटाव.. बॅलेट पेपर लाओ.. लोकशाही बचाव यासाठी वंचित बहुजन आघाडीची बैठक

सोलापूर : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर तीन डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्याचा आदेश देण्यात आला होता.
त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने महत्त्वपूर्ण अशी बैठक संपन्न झाली. जिल्ह्याच्या प्रत्येक गाव खेड्यातून ईव्हीएम हटाव च्या संदर्भात स्वाक्षरी घेऊन मोठी जनआदोलन उभारण्यात येणार असून जिल्ह्याच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला.
तत्पूर्वी विधानसभेमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्या वंचितच्या उमेदवारांचा सत्कार शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी शहर व जिल्ह्याच्या सर्व युनिटच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते, या बैठकीचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, महासचिव अनिरुद्ध वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष श्वेताताई राजगुरू, सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, महासचिव विनोद इंगळे, कामगार संघटनेचे महासचिव सुरज आरखराव सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष उपस्थित होते.