अद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करा : अरुण कोळी

सोलापूर : प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यावर्षीही पार्क चौक येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती कोळी महासंघाचे महाराष्ट्रराज्य उपाध्यक्ष अरुण कोळी यांनी दिलीय.
कोळी महासंघ संचलीत ए बी ग्रुपच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोलापूर येथील पार्क चौक येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त 20 ऑक्टोबर रोजी निघणाऱ्या रोड शो साठी प्रमुख अतिथी म्हणून कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार रमेश पाटील तसेच कोळी महासंघाचे युवा राज्याध्यक्ष मच्छीमार सेलचे अध्यक्ष चेतन पाटील, कोळी महासंघाचे राज्य उपनेते देवानंद भोईर तसेच प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मण कोळी आणि पश्चिम महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष अरुण कोळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पार्क चौक येथे 17 ते 20 ऑक्टोबर दरम्यान आद्यकवी महर्ष वाल्मिकी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ऑक्टोबर रोजी शहर आणि जिल्ह्यातील कोळी बांधवांच्या उपस्थितीमध्ये भव्य रोड देखावा काढण्यात येणार आहे.
पार्क चौक येथे होणाऱ्या आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती साठी कोळी महासंघ युवा जिल्हाध्यक्ष सुरेश प्याटी, एबी ग्रुप कार्याध्यक्ष बन्नी कोळी, ए बी ग्रुपचे खंदे समर्थक पवन दोरकर, उत्सवा अध्यक्ष मयूर बिराजदार, उपाध्यक्ष सचिन सावळगी, अंबरीश कोळी, नितीन कोळी, विशाल कोळी, नितीन वालेकर, आनंद कामठे, सिद्धाराम प्याटी आधी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.