क्राईमधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसोलापूर

सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, नवरात्रौत्सव २०२४ शांतता कमिटी बैठक

सोलापूर : प्रतिनिधी

पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षते खाली नवरात्रौत्सव २०२४ चे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी, नवरात्रौत्सव उत्सवाचे पदाधिकारी, सदस्य, यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीची प्रस्तावना डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.

०३ ऑक्टोंबर २०२४ रोजी ते १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी पर्यंतचे कालावधीत नवरात्रौत्सव २०२४ साजरा करण्यात येणार आहे.b १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविणेबाबत सुचना देण्यात आल्या. नवरात्रौत्सव करीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा जबरदस्तीने वर्गणी मागू नये. सर्व मंडळांनी आपल्या मंडळाची रितसर धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करावी. उत्सव काळात सर्व मंडळानी सीसीटीव्ही कॅमेरेंची व्यवस्था करावी, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा २/३ भाग मोकळा सोडावा.

मोकाट जनावरांपासुन मुर्तीस धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचे पावित्र्य राखावे, मंडळांकडुन जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंदी द्यावी. तसेच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणाबाबत जनजागृती करावी. देखावे, रोषणाई पाहण्यास येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांकरीता स्वतंत्र रांगेची सोय करावी प्रवेशाकरीता आणि बाहेर जाण्यास स्वतंत्र गेट असावेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.

सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. मंडाळांनी महावितरण विभागाकडुन अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्ट सर्कीट होवून इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर टी ओ कडुन तपासणी करावी. मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरु नये, वाहनांवरील देखाव्यांची जंची अडथळा होणारी नसावी. मिरवणुक संवेदनशिल ठिकाणी जारत वेळ रेंगाळत ठेवू नये. मिरवणुकीच्या वेळी ट्रिपलशिट फिरू नये, वाहनांचे सायलेंन्सरच्या पुंगळ्या काढून वाहने चालवू नये व हुल्लडबाजी करू नये. मिरवणुक मार्गात बदल करू नये. इतर धर्माच्या भावना दुखावणार नाही यांची काटेकोर दक्षता घ्यावी मंडळाने स्थापन केलेल्या मुर्ती समोर स्वयंसेवक सतत हजर राहतील व मुर्तीची देखभाल करतील याची पुरेपुर काळजी घ्यावी.

सोशल मिडीयावरुन काही अक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे. नवरात्रौत्सव-२०२४ मंडळानी ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी. ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. तसेच कोजागिरी पोर्णिमेनिमित्त पायी तुळजापूरला जाणारे देवी भक्तांना कोणत्याही प्रकारचे त्रास व अडथळा होवू नये, तसेच कायदा, सुव्यवस्था आबाधित राहण्याकरीता योग्य तो चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात येईल.

त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्यानंतर सदर सुचनेचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, आर टी ओ, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रुपरेषा बघुन समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले.

मा. पोलीस आयुक्त सो यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी अडचणीचे निरसण केले. उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल. शासनाने नेमून दिलेल्या सुचना पाळल्या पाहिजेत. तसेच योग्य तो बंदोबस्त नेमू असे सांगून गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छा देवून बैठकीला उपस्थितांचे आभार मानले.

सदर बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार, अजित बोन्हाडे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), विजय कबाडे, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ), प्रताप पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-१, राजन माने, गुन्हे शाखा खिरडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतुक शाखा, तसेच आशिष लोकरे उपायुक्त, सोलापूर महानगर पालिका, महानगर पालिकेकडील अधिकारी सारिका अकुलवार, आशिष मेहता, कार्यकारी अभियंता, महावितरण, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील आसिफ शेख, अग्नीशामक अधिकारी अच्युत्त दुधाळ, तसेच, सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार व शांतता कमिटीचे सदस्य, व पत्रकार बंधु उपस्थित होते.

तरी उपरोक्त प्रमाणे शांतता समिती सदस्य यांचे समवेत घेण्यात आलेल्या बैठकीतील ठळक मुद्यांबाबत आपले लोकप्रिय दैनिकात प्रसिध्दी करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!