सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा सप्ताहात सीएसईचा दबदबा

सोलापूर : प्रतिनिधी
केगाव येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रीडा सप्ताह उत्साहात पार पडला. यात जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन कॅम्पस डायरेक्ट संजय नवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे, डॉ. रवींद्र व्यवहारे, प्रो. करीम मुजावर यांची उपस्थिती होती. क्रीडा सप्ताहात सांघिक सहा आणि वैयक्तिक नऊ अशा १५ प्रकारात क्रीडा सप्ताह पार पडला. खो – खो, व्हॉलीबॉल, फूटबॉल, कबड्डी, हॉकी, क्रिकेट अशा सांघिक तर कॅरम, टेबल टेनिस, चेस, रनिंग, लॉगजंप, थाळी फेक, गोळा फेक, रिले, मॅरेथॉन अशा वैयक्तिक प्रकारात स्पर्धा पार पडल्या.
व्हॉलीबॉल मुलांमध्ये एईसीएच (एस वाय अ) प्रथम तर सिव्हिल विभागाने द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींमध्ये ईएलईसी विभाग प्रथम तर रामानुजन विभाग उपविजेता ठरला. फुटबॉलमध्ये मुलांत एमईसीएच प्रथम तर ईएनटीसी विभाग उपविजेता ठरला. मुलींमध्ये सीएसई विभाग प्रथम तर ईएनटीसी विभाग उपविजेता ठरला. कबड्डीमध्ये मुलांत एमईसीएच (एसवाय अ) प्रथम तर एमईसीएच (टीवाय) उपविजेता ठरला. मुलींमध्ये कल्पना विभाग प्रथम तर एमईसीएच उपविजेता ठरला. हॉकीमध्ये मुलांत ईएनटीसी प्रथम तर एमईसीएच विभाग उपविजेता ठरला. मुलींमध्ये सीएसई प्रथम तर एमईसीएच उपविजेता ठरला. क्रिकेट मुलींमध्ये सीएसई विजेता तर ईएनटीसी उपविजेता ठरला. खो – खो खेळात मुलीत सीएसई प्रथम तर कल्पना विभाग उपविजेता ठरला.
क्रीडा समन्वयक प्रो. करीम मुजावर, क्रीडा शिक्षक प्रशांत, विद्यार्थी क्रीडा सरचिटणीस अभिजित चव्हाण, क्रीडा सचिव महेश घोगे, क्रीडा सहसचिव म्हणून अमर नवले, प्राजक्ता सोनटक्के यांनी यासाठी परिश्रम घेतले.
या क्रीडा सप्ताहात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलींमध्ये प्राजक्ता सोनटक्के आणि मुलांमध्ये साक्षात धोत्रे यांनी किताब पटकवला. तर सर्वात जादा पदके मिळवण्याचा मान सीएसई विभागाने पटकाविला. बक्षिसांचे वितरण कॅम्पस डायरेक्ट संजय नवले यांच्या हस्ते करण्यात आले.