शिवसेना पक्षाच्या वतीने प्रीपेड मीटर च्या सक्तीच्या विरोधात, नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रबोधन व फॉर्म वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याला शिवसेनेने विरोध दर्शवला असून त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी शिवसेनेने विद्युत मीटर नको असा मजकूर असलेले फॉर्म नागरिक व नवी पेठेतील व्यापाऱ्यांना देऊन सदर मीटर बसवल्यास ग्राहकांचे कसे नुकसान होणार आहे हे समजावून सांगितले.
नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी शिवसेनेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन, शिवसेनेची भूमिका समजावून घेऊन, प्रीपेड मीटर ला विरोध केला.
प्रीपेड मीटर नको असलेले फॉर्म भरून वीज मंडळाला देण्याचे आश्वासन दिले. शिवसेनेच्या भूमिकेचे स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख महेश धाराशिवकर, जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, शहर उपप्रमुख सुरेश जगताप, संदीप बेळमकर, लहू गायकवाड, दत्ता खलाटे, विजय पुकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.