उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त 61 ज्येष्ठ नागरिकांचा केला सन्मान, अमोल शिंदे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसा निमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा शिवसेना शहर जिल्हा कार्यालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना साजेचे असे काम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी करून दाखवले. वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करत, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांनी समाजा समोर एक आदर्श निर्माण केला.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या अध्यक्षेखाली तर पंचांग कर्ते मोहन दाते, प्रशांत बडवे, मनोज शेजवाल, दास शेळके, अभय कटाप, दत्तात्रय मेनकुदळे, हरिभाऊ चौगुले, तुकाराम मस्के, संजय सरवदे, नवनाथ चव्हाण, राजकुमार शिंदे, प्रभाकर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी शहर परिसरातील असंख्य जेष्ठ नागरिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी जेष्ठ महिलांनी व नागरिकांनी उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो अश्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जयश्री पवार, पूजा चव्हाण, सुनंदा साळुंके, मनीषा नलावडे, मारता असादे, शशिकला कस्पटे, अनिता गवळी, अश्विनी भोसले यांच्यासह सर्व पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.