जरांगे पाटील यांच्या सभास्थळी एलईडी स्क्रीनची व्यवस्था, सभेच्या माहितीचे डिजिटल फलक समन्वयकांच्या हस्ते लोकार्पण

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅलीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढत समाज बांधवांची मते जाणून घेत त्यांना गरजवंत मराठ्याचा लढा आणि प्रशासनामधील सुरू असलेल्या घडामोडींची माहिती देणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याची सुरुवात सोलापुरात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शांतता रॅली नंतर भव्य सभा होणार आहे. या सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. या शांतता रॅली आणि सभेचे नियोजन मराठा क्रांती मोर्चा सोलापुर यांच्या वतीने करण्यात येत आहे. सभा मंडपाचे पूजन अंतरवाली सराटी जालना येथून आलेल्या मराठा बांधवांच्या हस्ते करण्यात आले.
सात ऑगस्ट रोजी शहर आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या मराठा बंधू-भगिनींना जरांगे पाटील यांचे भाषण, रॅली पाहता यावी यासाठी जवळपास दहा ते बारा ठिकाणी LED स्कीन लावण्यात येणार आहे. ही एलईडी स्किन कोठे कोठे लावावी जेणेकरून मराठा बांधवांना सभा स्थळावरील संपूर्ण भाषण जागेवर बसून पाहता येईल याचे नियोजन मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केली. या सह रिक्षा आणि फोर व्हीलर वर सात ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे सोलापुरात येणार असून त्याची सर्वांना माहिती मिळावी यासाठी डिजिटल बोर्ड समन्वयकांच्या हस्ते लावण्यात आले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक अमोल शिंदे, श्रीकांत घाडगे, इंद्रजीत पवार, अनंत जाधव, रवी मोहिते, शेखर फंड, योगेश पवार, बाळासाहेब गायकवाड, निलेश शिंदे, यांच्यासह युवक उपस्थित होते.