विटा येथील पत्रकार मारहाण प्रकरणी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा जाहीर पाठिंबा.

सोलापूर : प्रतिनिधी
विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर परवा झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हाध्यक्ष दिलीप मोहिते, सचिव इलाही मुलानी, वाळवा तालुका खजिनदार एकनाथ कांबळे यांनी विटा येथील मोर्चामध्ये सहभागी होत जाहीर पाठींबा दर्शवत निषेध वेक्त केला.
दोन दिवसापूर्वी सत्याची बाजू मांडल्याच्या रागातून काही गुंडांनी विटा येथील निर्भीडपणे लिहिणाऱ्या पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्याचा निषेध म्हणून सर्वपक्षीय व सर्व संघटनेच्या पदाधिकारी व पत्रकारांनी एकत्र येत आज दुपारी बारा वाजता विटा येथे मोर्चाचे आयोजन केले होते.
या मोर्चामध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकार पिसाळ यांना पाठिंबा दर्शवत मोर्चामध्ये सहभाग घेतला इथून पुढे याच प्रकारे कोणत्याही पत्रकारावरती भ्याड हल्ला झालाच तर डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना कायम त्यांच्या पाठीशी राहणार आहे. तर आज विटा येथे सर्व संघटनेचा माध्यमातून विटा पोलीस स्टेशनला निवेदन देऊन दोशीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.