संतोष गायकवाड यांचा स्तुत्य उपक्रम, संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
GK मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था यांच्या वतीने 12 फेब्रुवारी रोजी समस्त चर्मकार समाजाचे श्रद्धास्थान संत रोहिदास महाराज यांची 648 मध्यवर्ती जयंती उत्सव सात रस्ता संगमेश्वर कॉलेज या ठिकाणी साजरा करण्यात आला.
संस्थेचे 8 वर्ष असून या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्रीकांत कांबळे, डीवायएसपी सरकारी वकील गिरीश सरवदे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड,
उद्योगपती विजयकुमार बकरे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी यशपाल गवळी (सेवानिवृत्त), शिव निर्णय चे संपादक अनिल शिराळकर, जीके संस्थेचे सचिव वैजनाथ बिराजदार, अशोक ढोणे पत्रकार, जी के संस्थेचे कार्याध्यक्ष सुरज आखाडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, विलास कांबळे, शुभम कांबळे, रोहित पाटील, गोपी फेटेवाले तसेच समाज बांधव मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच संध्याकाळी निराधार माता महिला भगिनींसाठी हळदी कुंकू, भेटवस्तू, मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच वृद्ध महिला भगिनी ब्लॅंकेट वाटप, संजय गांधी श्रावणबाळ जयंती लाभार्थ्यांना मंजूर आदेश पत्र देऊन कार्यक्रमात भक्ती संगीत, जुने हिंदी गाणी व मराठी गाण्यांचा आर्केस्ट्रा मधुर गाणी कार्यक्रम ठेवला होता.
या कार्यक्रमास जवळपास शंभर एक महिला भगिनी उपस्थित होत्या तसेच संध्याकाळी अल्प भोजनाचीही स्वादिष्ट असा फराळ ठेवला होता हा कार्यक्रम संत रोहिदास जयंती निमित्त ठेवला आहे.