दिलीप कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा नव युवा नेत्यांनी आदर्श घ्यावा : पुरुषोत्तम बरडे
शिवजन्मोत्सव निमित्त तेजस्विनी महिला बचत गट आणि जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीने छावा सिनेमाचे दोन शो महिलांसाठी मोफत दाखवणार : दिलीप कोल्हे

सोलापूर : प्रतिनिधी
जय महाराष्ट्र तरुण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात येतो यंदाच्या वर्षीही शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे शिवरायांची प्रतिष्ठापना श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, विश्वस्त राजन जाधव, पुरुषोत्तम बरडे, उत्सवा अध्यक्ष सुशील बंदपट्टे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमार, जवाहर जाजू, भाजप शहर सरचिटणीस शेखर फंड, माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार, राष्ट्रवादीची युवा नेते महेश कुलकर्णी, यांच्यासह नुकतेच गरीब कुटुंबातून कष्टाने एमपीएससी पास झालेल्या सरोजनी आणि संजीवनी भोजने आणि त्यांचे वडील जोतिराम भोजने यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे पूजन करण्यात आले.
श्री शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे आणि शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे, माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांच्या हस्ते एमपीएससी पास सरोजनी आणि संजीवनी भोजने त्यांचे वडील जोतिराम भोजने यांचा सत्कार करण्यात आला. आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे म्हणाले, दिलीप भाऊ कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन आजच्या युवा नेत्यांनी आपली वाटचाल करावी. सामाजिक कार्यातील “अनेक आकांंचे आका” दिलीप भाऊ कोल्हे हे आहेत.
यावेळी बोलताना जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे संस्थापक दिलीप कोल्हे म्हणाले, मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात यंदाच्या वर्षी बचत गटातील महिलांना आणि मिल कामगार महिलांना छावा सिनेमा पाहता यावा यासाठी २० तारखे नंतरचे दोन सिनेमा शो आम्ही बुक करत आहोत. अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे पदाधिकारी सदस्य युवक आणि चाळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.