श्रीकृष्ण जन्मोत्सव मंदिर, बाल हनुमान तरुण मंडळ, शिवनेरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
पत्रा तालीम सवार गल्ली येथील बाल हनुमान तरुण मंडळ, श्रीकृष्ण जन्मोत्सव मंदिर, शिवनेरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सद्गुरु गुरुमाऊली प्रभाकर स्वामी महाराज प्रथोत्सव निमित्त श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण मुर्ती आणि प्रभाकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंजुषा विजयकुमार मुकडे यांच्यातर्फे 500 भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी बाल हनुमान तरुण मंडळाच्या येथे प्रभाकर महाराजांच्या पालखीचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्रीकृष्ण मंदिरातील प्रभाकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. या वेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी नगरसेविका सुषमाताई घाडगे, माजी नगरसेविका शांताकाकू राजाराम दुधाळ, महिला भजनी मंडळाच्या मंजुषा मुडके, रेखा फंड, आणि बाल हनुमान तरुण मंडळाचे अमर दुधाळ, बापू अमनुर, पवन पाटील, कुमार ठाकूर, सतीश कुदळे, आनंद कोलारकर, विजय पालकुतवार, बाळासाहेब कदम, यांच्यासह शिवनेरी प्रतिष्ठान श्रीकृष्ण जन्म समिती यांचे पदाधिकारी सदस्य आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.