राहुल सोलापूरकर वर देशद्रोहा चा गुन्हा दाखल करा : विष्णू कारमपुरी

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय महापुरुषांना अवमानकारक शब्द वापरणाऱ्या राहुल सोलापूरकर, याच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल करा, अशा मागणीचे निवेदन ‘मी सोलापूर माझे सोलापूर’ परिवर्तन व विकास समितीच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आले.
जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांना देण्यात आलेल्या, निवेदनात राहुल सोलापूरकर हा आपल्या वक्तव्यातून हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, श्री छत्रपती शिवाजी महाराज व व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महापुरुषांबाबत उद्देशून अपमानित व नंदनीय अशी भाषा वापरून, देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचबरोबर ज्या महान युगपुरुषांमुळेच आपल्या देशाची संस्कृती बनली आहे आणि सर्व महान महापुरुष हे देशाचे आदर्श आहेत.
परंतु राहुल सोलापूरकर हा केलेल्या चुकीचा व अपमानित केलेल्या वक्तव्यामुळे, भावी पिढीवर त्याचा परिणाम होईल म्हणून राहुल सोलापूरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. राहुल सोलापूरकर यांनी प्रसिद्धी माध्यमातून त्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याची माफी मागितली आहे. परंतु माफी मागून चालणार नाही, योग्य ती कार्यवाही झालीच पाहिजे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना कारमपुरी म्हणाले की, राहुल सोलापूरकर हा आता माफी मागतोय पण गुन्हेगाराला माफी नाहीच आणि हा माफीच्या लायकीचा नाहीच. म्हणून त्याच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा असे म्हणाले. विष्णू करमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात प्रसाद जगताप, विठ्ठल कुराडकर, शिवा सारंगी, शुभम कारमपुरी, तीमाप्पा कचगुंडी, रेखा आडकी, राधिका मीठा, माधवी गोडा, सविता दासरी, पद्मा मॅकल, उपस्थित होत्या.