जनमानसात ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणून श्रीरामांना संबोधतात, श्रीरामानी धर्माच्या सर्व मर्यादा पाळून आदर्श निर्माण केला.
रामराज्य पुन्हा यावे हि अपेक्षा रामनवमी निमित्त जनतेतून येते, श्रीराम राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होते.

मुंबई : प्रतिनिधी
श्रीराम हे भारतात अत्यंत पूजनीय आणि एक आदर्श पुरुष आहेत आणि जगातील अनेक देशांमध्ये श्री राम यांना अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया यासह अनेक देशात आदर्श म्हणून पूजले जाते. त्याला पुरुषोत्तम या शब्दाने सुशोभित केले आहे. मर्यादा-पुरुषोत्तम राम हे अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौशल्ये यांचे ज्येष्ठ पुत्र होते. रामाच्या पत्नीचे नाव सीता होते, त्यांना तीन भाऊ होते- लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. हनुमान हा रामाचा सर्वात मोठा भक्त मानला जातो. रामाने लंकेचा राजा (ज्याने अधर्माचा मार्ग स्वीकारला होता) रावणाचा वध केला. श्रीरामांची मर्यादा पुरुषोत्तम अशी ख्याती आहे. श्रीरामानी राज्य, मित्र, आई-वडील, अगदी पत्नीलाही सन्मानाचे पालन करण्यासाठी सोडले. त्यांचे कुटुंब आदर्श भारतीय कुटुंबाचे प्रतिनिधित्व करते.
श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला.श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.”
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांंवरून दिसून येते. म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात ‘मर्यादापुरुषोत्तम’ असे म्हटले जाते. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे आहे.