राजकीय

निंबाळकर कुटुंबीयांकडे १६८ कोटींची संपत्ती तर धैर्यशील मोहिते-पाटील ४० कोटींचे मालक

रणजितसिंहांना ३० कोटी अन् मोहिते-पाटलांना ३१ कोटींचे कर्ज

सोलापूर : प्रतिनिधी

माढा लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दोन्ही उमेदवार कोट्यधीश असून, दोघांना प्रत्येकी ३० कोटींचे कर्जही आहे. सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून नाईक-निंबाळकर यांची चर्चा असून, त्यांच्याकडे १ कोटी ४६ लाख रुपये किमतीची मर्सिडिझ गाडी – आहे. नाईक निंबाळकर यांच्या परिवाराकडे एकूण १६८ कोटींची संपती आहे. तर धैर्यशील व त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण ४० कोटींची संपत्ती आहे.

रणजितसिंह हिंदूराव नाईक-निंबाळकर

वय : ४७

शिक्षण: बीए, शिवाजी विद्यापीठ

रोख रक्कम: ९५ लाख ४६ हजार रुपये

जंगम मालमत्ता : ११८ कोटी २५ लाख २१ हजार रुपये

स्थावर मालमत्ता : ३ कोटी ५२ लाख ३५ हजार रुपये

वाहने कोणकोणती : मर्सिडिड़ा बेन्द्रा: किंमत १ कोटी ४६ लाख ८८ हजार रुपये, २४ लाख रुपये किमतीची फॉर्च्यूनर तसेच यासोबत ८ लाख ४६ हजार रुपये आणि ८ लाख ८ हजार रुपये अशा दोन आलिशान चार चाकी गाड्या

धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील

वय : ४७

शिक्षण : एमबीए, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक

रोख रक्कम : ६४ हजार ९०७ रुपये

जंगम मालमत्ता : १० कोटी २३ लाख ५ हजार रुपये

स्थावर मालमत्ता : २ कोटी ४६ लाख ७७ हजार रुपये

सोने : ७२४ ग्रॅम ज्याची किमत ४८ लाख ८९ हजार रुपये

स्थावर मालमत्ता : २१ कोटी १७

लाख ८ हजार रुपये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!