गृहमंत्री फडणवीसांकडे तक्रार, भाजपच्या कट्टर कार्यकर्त्याला मारहाण, गुन्हा दाखल मात्र आरोपी मोकाट

सोलापूर : प्रतिनिधी
बाळकृष्ण गुरव, मुक्काम पोस्ट कुरुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर याने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हॉटस्अप आणि ई-मेल द्वारे आपली व्यथा मांडत केली तक्रार, न्याय देण्याची केली मागणी.
गृहमंत्री फडणवीस यांना व्हॉटस्अप आणि ई-मेलद्वारे आपली व्यथा मांडताना बाळकृष्ण गुरव म्हणाला, मी एक गुरव असून अल्पसंख्यांक आहे मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता असून आदरणीय रामभाऊ सातपुते यांना मतदान केलेले आहे तसेच माझ्या समाजाला सुद्धा 85 टक्के मतदान हे भाजपला झालेले आहेत. आपणास विनंती आहे की, माझ्या कुरुल गावातील वादातून माझ्यामागे षडयंत्र लावून गावातील काही लोकांनी मला खोटे गुन्हे दाखल करून मला काल एवढे बेदम मारहाण केलेले आहे पाय बांधलेले आहे माझी पाठ सोडलेली आहे अक्षरशा आत्महत्या करू वाटायला लागली आहे साहेब आपण कर्तव्यदक्ष गृहमंत्री आहात व तुमच्याकडे बघूनच मी आत्महत्या करायचा प्रयत्न सोडला सात लोकांवर गुन्हा दाखल केलेले आहेत.
परंतु मी काल एटीएम मधून 47 हजार रुपये काढले होते गळ्यात सोन्याची चैन होती ते दोन्ही पण गडप झालेले आहेत सीसीटीव्ही फुटेज मध्ये मारहाण करताना शेतात घेऊन जाताना गाडीवर घेऊन मारताना सर्व व्हिडिओ आहेत व गाव पूर्ण कुरुल गाव माझ्या नावाने हळहळ करत आहे.
त्यामुळे साहेब बघा एका ओबीसी समाजातील होतकरू कार्यकर्त्याला व मी स्वतःच्या पायावर उभा असताना तू बुलेट कुठून आणली गाडी कुठली घेतली एवढा रुबाब कसा राहतो आमच्या जाधवांच्या समोर तुझी मस्तीच कशी जेवतो बघ तुला गावातलं पळवून लावतो का नाही बघ मला प्रमोद अभिमान लांडे, समर्थ प्रमोद लांडे, शत्रुघन गोविंद जाधव, बाळासो गोविंद जाधव, सुरज शत्रुघन जाधव, प्रतापसिंह महादेव निकम, प्रशांत पंडित निकम तसेच धनाजी शत्रुघन जाधव यांनी बेदम मारहाण करून किडनॅपिंग करून हातपाय बांधून माझी पाठ सोडलेली आहे खिशातले पैसे आयफोन कंपनीचा मोबाईल घेतलेला आहे. तो सुद्धा काढून घेतला तरी आपल्याला विनंती आहे की सर अधिवेशन सुरू आहे पण तुम्ही माझ्या नक्कीच या अन्यायावर शेवटची अपेक्षा तुमची तुम्ही मला न्याय द्याल एवढीच छोटीशी हात जोडून विनंती करून थांबतो व आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र असे म्हणत जखमी युवकाने गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना ई-मेल करून आपली व्यथा मांडली. गृहमंत्री फडवणीस याची दखल घेणार का.? आणि जखमी युवकाला न्याय मिळणार का.? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.