सोलापूरक्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिक
धमकी देणाऱ्या वकिला विरुद्ध गुन्हा, 5 लाख रुपये घे म्हणून दिली धमकी

सोलापूर : प्रतिनिधी
पतीचे पहिले लग्न झालेले असतानाही ते लपवून लग्न जमविण्यासाठी महादेव कांबळे याच्यासह इतरांनी मध्यस्थी केली. पहिले लग्न लपवून विवाह केला.
त्यानंतर हा वाद मिटविण्यासाठी पती सुजितचा वकिल मित्र अजित शाहीर याने फोन करून पाच लाख रुपये घे म्हणून धमकी दिल्याची फिर्याद ज्योती सूर्यवंशी, राहणार हनुमान नगर, शिकलगार वस्ती यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली.
त्यावरून पती सुजित सूर्यवंशी, सासू सुनिता सूर्यवंशी, सासरा बलभिम सूर्यवंशी, नणंद रोहिणी सूर्यवंशी व अजित शाहीर व महादेव कांबळे सर्वजण राहणार हलगरा, तालुका निलंगा यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला.