DPDC मध्ये गोंधळ, आमदार यशवंत माने यांच्या मदतीला किसन जाधव तर चरणराज चवरे च्या मदतीला धावले मनिष काळजे

सोलापूर : प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नुकतेच मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय सुरू व्हावे किंवा सुरू होऊ नये या मागणीसाठी दोन्ही गटांकडून मोहोळ मध्ये आंदोलन झाले परंतु नक्की पुढे काय होणार या विचारात मोहोळकर असताना आजच्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत यावरून मोठा गोंधळ झाला.
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नुकत्याच मंजूर झालेल्या अपर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड वादावादी पाहायला मिळाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या अप्पर तहसील कार्यालयाला प्रचंड विरोध केला.
यावेळी बोलताना भाषा अरे तुरेवर गेल्याने आमदार यशवंत माने हे त्यांना प्रत्युत्तर देत होते. यावेळी चरणराज चवरे यांच्या मदतीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे उभारले तर दुसरीकडे आमदार यशवंत माने यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव धावून आले.