महिला व मुलींना संरक्षणासाठी कडक कायदे करा, मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे मागणीसाठी धरणे आंदोलन

सोलापूर : प्रतिनिधी
मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने, जागतिक महिला दिनानिमित्त, मुलींना व महिलांना संरक्षणाचे कडक कायदे करा. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
८ मार्च जागतिक महिला दिन., या महिला दिनी महिलांचा सन्मान करण्याचा दिवस परंतु या निष्क्रिय सरकारमुळे महिला व मुली असुरक्षित आहेत म्हणून त्यांना संरक्षणाचे कायदे करावे., या मागणीसाठी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने, झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुनम गेट येथे महिलांचे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलना प्रसंगी विष्णू कारमपुरी यांच्यासह समितीचे कार्याध्यक्ष विश्वनाथ राठोड, विधीज्ञ शरद पाटील समिती सदस्या रेखा आडकी यांनी महिलांना संरक्षण न देणाऱ्या सरकारविरुद्ध निषेधाचे जोरदार भाषणे केली. त्यानंतर मागणीचे निवेदन विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी आंदोलक महिलांनी, महिला दिनाचा विजय असो, जागतिक महिला दिन चिरायू होवो, महिलांना संरक्षण न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महिलांना संरक्षण मिळालेच पाहिजे, हम सब एक है, मुख्यमंत्री हाय हाय, उपमुख्यमंत्री हाय हाय, केंद्र व राज्य सरकार हाय हाय, महिलांवर होणारे अत्याचार रोखू न शकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महिलांआसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा, अशा जोरजोरात घोषणा दिल्या.
विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या, धरणे आंदोलनात विश्वनाथ राठोड, ॲड.शरद पाटील, विठ्ठल कुराडकर, रेखा अडकी, राजू शिंदे, राधिका म्हंता, मनीष कोमटी, प्रसाद जगताप, ॲड.मुनिनाथ कारमपुरी, सिकंदर शेख, सविता दासरी, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, जमनाबाई बिरबनवाले, राधिका मीठा, शुभम कारमपुरी, अजय कारामपुरी, नवीन गजेली, प्रशांत जक्का, यांच्यासह महिला माता-भगिनी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात उपस्थित होत्या.