“हर शहर अब बनेगा मराठा भवन” या संकल्पनेने सबंध देशात प्रचार प्रसार सुरू, दौऱ्यातील मराठा बांधवांनी घेतली मराठा क्रांती मोर्चा समन्वयांची भेट

सोलापूर : प्रतिनिधी
हैदराबादची छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा सर्व धर्मीयांसाठी वरदान ठरत असून महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांची केवळ 100 रुपयात राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गोविंद भिसे यांनी दिली.
अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनचा मुख्य उद्देश हैदराबाद सारख्या क्लास वन सिटी मध्ये महाराष्ट्रातून तसेच अलग अलग राज्यातून येणाऱ्या मराठा बांधवांची आणि विद्यार्थ्यांची अगदी नाम मात्र म्हणजेच कमी रुपयांमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था व्हावी. हैदराबाद येथे डोळ्याचे विश्व प्रसिद्ध एल व्ही प्रसाद हॉस्पिटल, अपोलो, किम्स, यशोदा, केअर, तसेच पोटाच्या आजाराचे एशियन गॅस्ट्रो एंट्री लॉजिस्ट तसेच अनेक इंटरनॅशनल लेवल चे सुपर स्पेश स्पेशालिस्ट हॉस्पिटल ला इलाजासाठी, येणाऱ्या तसेच हैदराबाद येथे रोजगारासाठी, व्यापार उद्योगासाठी, शिक्षणासाठी, नोकरीच्या परीक्षेसाठी, नोकरीच्या इंटरव्यू साठी, तसेच हैदराबाद येथून मलिकार्जुन ज्योतिर्लिंग श्रीसेलम दर्शनासाठी, तिरुपती देवदर्शनासाठी तसेच अलग अलग कामासाठी हैदराबादला येणाऱ्या समाज बांधवांची आणि समाजाच्या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी. यासह प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवन आणि वस्तीगृह व्हावे ही संकल्पना घेऊन अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनचे समन्वयक देशभर दौरे करून याचा प्रचार प्रसार करत आहेत यानिमित्त ते सोलापूर दौऱ्यावर आले होते.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा सोलापूर च्या वतीनं अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनचे मुख्य समन्वयक गोविंद भिसे, बालाजी शिंदे, शंकर नरवाडे, ज्ञानेश्वर भिसे यांचा मानाजी शाल, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समन्वयक दास शेळके, अमोल शिंदे, श्रीकांत घाडगे, आनंद जाधव, शेखर फंड, बाळासाहेब गायकवाड, योगेश पवार, सागर गायकवाड, दिनेश जाधव, शिरीष जगदाळे, आदी उपस्थित होते.
आगामी काळात मराठा क्रांती मोर्चा सोलापुर च्या वतीने सोलापुरात ही मराठा भवन आणि मराठा मुला मुलींचे वस्तीगृह उभारणार असल्याची ग्वाही जेष्ठ आणि युवा समन्वयकांनी तेलंगणा सिकंदराबाद येथून आलेल्या मराठा बांधवांना दिली.