स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला डॉक्टरांनी काढला कॅन्डल मार्च, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा केला निषेध

सोलापूर : प्रतिनिधी
परराज्यातुन मेडिकलचे विद्यार्थी, डॉक्टर हे काम करण्यासाठी येत असतात त्या डॉक्टरांना सुरक्षा असावी, कोलकाता येथील एका महिलेवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली यावरून प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.
झालेल्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे कॅन्डल मार्च काढत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यात आला.
कोलकाता येथील आर. जी. कार मेडिकल कॉलेज मध्ये द्वितीय वर्षात असलेल्या रेसिडेंट डॉक्टर वरती झालेल्या अमानुष अत्याचार व खुनाचा निषेधार्थात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर संघटनेच्यावतीने वैश्यपायन मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉक्टरांनी कॅन्डल मार्च काढत त्या घटनेचा निषेध केला.
या संघर्षात महाराष्ट्र अससोसिएशन ऑफ रेसिडेंट डोव्टोर्स, सोलापूर नेही निषेधार्थ व समाजासाठी चोविस तास सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी संप पुकारला. शांततामय कॅण्डल मार्च हा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय च्या “बी-ब्लॉक” पासून ते सिविल चौक, रंगभुवन चौक ते परत सिविल चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर च्या “बी-ब्लॉक” पर्यंत काढण्यात आला. या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सिस्टर, ब्रदर्स, डॉक्टर उपस्थित होते.