बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर रावताला जोड्याने हनल असत, महाराष्ट्रात महिलांचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का.? : डॉ ज्योती वाघमारे (प्रदेश प्रवक्त्या, शिवसेना)
ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचं नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी केली होती टिका

सोलापूर : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत अमरावतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका सभेमध्ये नवनीत राणांवर टीका केली. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचं नाही, असे ते म्हणाले होते.
यावेळी टीका करताना राऊत यांनी वादाला तोंड फुटू शकणारे वक्तव्य केले आहे. विकासाचं पोरगं तुम्हाला झाले नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचे नाही. आपला उमेदवार बलवंत वानखेडे आहे. रात्र वैऱ्याची आहे. रात्रीस खेळ चाले, असे राऊत म्हणाले होते.
या टिकेचा शिवसेना प्रदेश प्रवक्त्या डॉ ज्योती वाघमारे यांनी चांगलाच समाचार घेतला, संजय राऊत यांनी नवनीत रानाच्या संदर्भात जी खालच्या पद्धतीची भाषा वापरलेली आहे ना जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर या रावताला जोड्याने हनला असता, पायताणाने हल्ला असता. पूर्ण महाविकास आघाडीला लाज आणणारी वक्तव्य रावतानी केली आहेत. अशा पद्धतीने एका महिलेला नाची म्हणणं, एखाद्या संदर्भात ती डोळा मारेल, बोलवेल एवढ्या खालच्या पद्धतीची विधान करत असताना हे पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेईल हा शिव छत्रपतींचा, जिजाऊ, सावित्री, रमाईंचा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रात महिलांचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का आहेत. असा सवाल ही त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला.