
सोलापूर : प्रतिनिधी
देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा तसेच प्रभाग क्रमांक ३ मधून सर्वाधिक मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली. भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी भवानी पेठ घोंगडे वस्ती परिसरातील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या सदाईश्वर निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा युवा नेते यतिराज होनमाने आदींचे उपस्थिती होती.
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा वाढीसाठी सुरेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे शहर उत्तर मधील भवानी पेठ घोंगडे वस्ती परिसर हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या 30 वर्षापासून आजतागायत सुरेश पाटलांनी भाजपाचा बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. अण्णा हे भाजपाचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते आहेत भाजपा वाढीमध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हवे आहे जनतेचा महायुतीला प्रचंड प्रतिसाद आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी अबकी बार ४०० पारचा संकल्प नरेंद्र मोदींनी केला आहे. यासाठी सुरेश पाटलांची ही भेट घेण्यात आल्याचे यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले.
राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ तसेच शहरातून आमदार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन आपकी बार ४०० पार हे नरेंद्र मोदीची संकल्पना साक्षात आणू अशी ग्वाही यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला.
यावेळी आमदार राम सातपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून सुरेश पाटलांचे बातचीत घडवून आणली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश पाटलांना आरोग्याची विचारपूस करून आमदार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणा अशा सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या. या भेटी दरम्यान उषा सुरेश पाटील, विनायक पाटील, बिपिन पाटील, अक्षय पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.