सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

देशमुख..आडम..शाब्दी..पवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज, काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरातील शहर उत्तर, दक्षिण आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्या म्हणजे 28 ऑक्टोबर रोजी अनेक जण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यात प्रामुख्याने सोलापूर शहर उत्तर मध्ये चार टर्म आमदार म्हणून निवडून येणारे भाजपचे विजयकुमार देशमुख हे पाचव्यानदा आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

कामगारांचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते माजी आमदार नरसय्या आडम हे देखील आपल्या हजारो कार्यकर्त्यांचा रॅलीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

AIMIM पक्षाच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील पहिली उमेदवारी ज्यांची जाहीर झाली आणि आपल्या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शहर मध्य मध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवणारे शहर मध्ये चे उमेदवार फारूक शाब्दी हे देखील आपला उमेदवारी अर्ज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भरणार आहेत.

मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून दक्षिण विधानसभा मतदारसंघात अनेक सामाजिक उपक्रम राबवत जनतेशी नाळ जोडलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तथा ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्दीय म्हणून ओळखले जाणारे संतोष पवार हे देखील आपल्या कार्यकर्त्यां समवेत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

एकंदरीत उद्या 28 ऑक्टोबर रोजी या उमेदवारांन सह अनेक अपक्ष देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना आपली कोणती भूमिका मांडणार हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!