
सोलापूर : प्रतिनिधी
पत्रा तालीम परिसरात आपकी बार मोदी सरकारचा नारा देत माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होम टू होम प्रचार करण्यात आला. प्रारंभी पत्रा तालीमच्या मानाच्या बजरंगबली चे पूजन करून होम टू होम प्रचारात सुरुवात करण्यात आली. प्रत्येक घरोघरी जाऊन भाजप मित्र पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांना मतदान करून सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला मदत करण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख यांनी केले. पत्रा तालीम परिसरातील कैकाड गल्ली, सळई मारुती मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर परिसरात घरोघरी जाऊन भाजपाच्या विकास कामांचे पत्रक देत राम सातपुते यांना मतदान करण्याचे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख, भाजप नेते श्रीकांत घाडगे, OBC प्रदेश उपाध्यक्ष संदीप जाधव, शहर चिटणीस शेखर फंड, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष आनंद कोलारकर, राष्ट्रवादी (AP गट) विद्यार्थी संघटना शहराध्यक्ष पवन पाटील, विस्तारक सतीश कुदळे, मंडल अध्यक्ष देविदास बनसोडे, युवा मोर्चा चिटणीस निलेश शिंदे, महेश बोकन, विजय पालकुतवार, शेंगर सर, संदीप माळी, आदीसह भाजप पदाधिकारी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.