
सोलापूर : प्रतिनिधी
जोडभावी पेठ पोलीस ठाणे कडील गहाळ झालेले एकुण २४ विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल्स (४,५०,०००/रु) चे तांत्रिक पध्दतीने शोध लावुन डी. बी. पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे मोबाईल गहाळ झालेबाबत तक्रारी वाढल्याने दाखल झालेल्या गहाळ मोबाईल यांचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुहास चव्हाण यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशीत केल्यांने डी. बी. पथकाचे प्रमुख सोमनाथ पडसळकर यांचे मार्गदर्शनाखाली पोहेको १६८५ खाजप्पा परसप्पा आरेनवरु नेम- जोडभावी पेठ पोलीस ठाणे यांच्याकडे सदरचे काम सोपविण्यात आले होते. त्यांने प्राप्त सीडीआरचे विश्लेषण करुन सन- २०२२, सन-२०२३ व सन २०२४ मधील २४ विविध कंपनीचे अॅन्ड्रॉईड मोबाईल (हॅन्डसेट) कि.अं. ४,४५०००/- रु किमंतीचे मोबाईल सोलापुर शहर व परराज्यातुन हस्तगत केलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त साो. (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोनि/शबनम शेख (गुन्हे) यांचे मार्गदर्शना खाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख, सपोनि / पडसळकर, पोहेकॉ/१६८५ खाजप्पा आरेनवरु पोहेकॉ/१०७६ श्रीकांत पवार, सायबरचे नेमणुकीस असलेले पोहेकॉ/६०१ प्रकाश गायकवाड, यांनी पार पाडले आहे.