प्रणिती शिंदे यांना मताधिक्य देण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वांनी एक दिलाने काम करावे : दिपक गायकवाड (शिवसेना नेते)
शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार, आरक्षण विरोधी, शिवसेना उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या महायुतीला निस्तनाबुत करा : दिपक गायकवाड (शिवसेना नेते)

सोलापूर : प्रतिनिधी (मोहोळ)
सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मोहोळ शहर महाविकास आघाडीची नियोजन बैठक शिवसेना नेते दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एचडीएफसी बँक कुरुल रोड येथे घेण्यात आली. या बैठकीस महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. 30 तारखेला प्रणिती शिंदेंची मोहोळ शहरात ठीक ठिकाणी कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यासाठीची ही महत्त्वपूर्ण नियोजनाची बैठक ठेवण्यात आली होती.
सर्व मित्र पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ एकत्रित येऊन एकदिलाने काम करून संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या लोकशाही विरोधी सरकारच्या मुस्क्या आवळण्यासाठी एक दिलाने काम करूया असे प्रतिपादन शिवसेना नेते दीपक गायकवाड यांनी केले. पुढे म्हणाले पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून हाताच्या पुढे बटन दाबून मतदान करण्याचा प्रचार करावा. शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार, आरक्षण विरोधी, शिवसेना उद्धवजी ठाकरे यांचे शरद पवार राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या महायुतीला निस्तनाबुत करा, सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार निवडून देण्यासाठी रात्रीचा दिवस करा असे आवाहन केले.
यावेळी माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सीमाताई पाटील, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन ताई शेख, राष्ट्रवादीचे संजय क्षीरसागर, शहर प्रमुख सत्यवान देशमुख, काँग्रेस पार्टीचे बाळू तांबोळी, शरद पवार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विनय पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले, गोरख गोडसे, विक्रम देशमुख, महादेव गोडसे, शिवरत्न गायकवाड, किरण शिंदे, संगीता पवार, सोमनाथ पवार, युवक शहराध्यक्ष चेतन पाटील, किशोर पवार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.