नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी मशिदीं मधून फतवे काढले जात असून यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार : राम सातपुते
देव, देश आणि धर्माचे हित पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी : सुधाकर बहिरवाडे (आयोजक, समस्त हिंदू संघटना)

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी विजयासाठी मोदीत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर भर दिला असून त्यांच्या पाठीशी सोलापूर शहर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनाही उभ्या राहिल्या आहेत.
जुन्या एम्लॉयमेंट चौकाजवळील शांतीसागर मंगल कार्यालयात आयोजित हिंदुत्ववादी संघटनांच्या मेळाव्यात भाजपचे उमेदवार सातपुते उपस्थित होते. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी मंगल कार्यालय दुमदुमून गेले. गळ्यात भगवे उपरणे आणि डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते उपस्थित होते. यात शहर जिल्ह्यातील सकल हिंदू संघटनांनी पुढाकार घेतला होता.
या हिंदु संघटना सोलापुरात मेळवा रामभाऊ सातपुते यांना पाठिंबा देण्यासाठी समस्त हिदु संघटना उपस्थित होत्या यावेळी व्यासपीठावर विश्व हिदु परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण महाराज चव्हाण, रवि बंडे, हिंदुमहासभा सोलापुर शहर अध्यक्ष सुधाकर बहिरवाडे, श्रीराम जन्मोत्सव समीती प्रमुख संजय साळुंखे, सागर अतनुरे, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सुभाष पवार, पानिवेस तालिम अध्यक्ष पंकज काटकर, अक्षय अजिंखाने यतीराज होनमाने, समर्थ बंडे, हिंदुराष्ट्र सेना आनंद मुसळे, ओमसाई प्रतिष्ठानचे प्रमुख शिवराज गायकवाड, सागर अतनुरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ओंकार देशमुख, आंबादास गोरंटला, रणधीर स्वामी, अभिजीत जाधव, अर्जुन मोहिते यांची प्रमुख उपस्थितीत होती.
या मेळाव्यात राम सातपुते यांना समर्थन देताना हिंदुत्ववादी संघटनांनी, ज्यांनी राम मंदिर बांधले, आम्ही त्यांनाच निवडून आणू, असा निर्धार केला. तर सातपुते यांनी नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी मशिदींमधून फतवे काढले जात असल्याचा पुनरूच्चार करीत, यासंदर्भात आपण स्वतः निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील समस्त हिंदूवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.