राजकीय

प्रणिती शिंदेंसाठी कर्नाटक मंत्री एम बी पाटील यांनी बांधली लिंगायत समाजाची मोट, मोदींनी दाखविलेल्या स्वप्नातील अच्छे दिन कुठे आहेत ? – एम बी पाटील.

सोलापूर : प्रतिनिधी

काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे मंत्री एम बी पाटील यांनी सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे लिंगायत समाजाची बैठक घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतदान करण्यावषयी आहवान केले.

या बैठकीला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार विठ्ठल कटकधोंड, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार विक्रम सावंत, सुरेश हसापुरे, चेतन नरोटे, राजशेखर शिवदारे, शिवसेनेचे अमर पाटील, बाळासाहेब शेळके, श्रीशैल नरोळे, हरीश पाटील, प्रकाश वाले, अशोक निंबर्गी, विजय कुमार हत्तूरे, केदार उंबरजे, प्रथमेश म्हेत्रे, भीमाशंकर जमादार, भीमाशंकर बाळगे, अशोक देवकते, सुधीर लांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

एम बी पाटील म्हणाले, मोदींनी स्वप्न दाखवलेले आच्छे दिन कुठे आहेत, महागाई वाढली, गॅस टाकी महागली, पेट्रोल डिझेल महागले हे तर बरेच दिन म्हणायचे ना. मनमोहनसिंग हे पंतप्रधान असताना आर्थिक स्थैर्य होते, राजीव गांधी असताना अनेक धोरण राबवले, हा मोदी देशावर कर्जाचा डोंगर ठेवून देश लुटत आहे, जाती पातीचे राजकारण सुरु केले आहे, धर्माच्या नावाखाली भावनिक करतो, आता जनता त्यांना कंटाळली असून यंदा सोलापुरात परिवर्तन झाले पाहिले त्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनाच विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ते स्वतः सोलापुरात येऊन लिंगायत समाजाची बैठक घेतली, त्यांचे कायम सहकार्य असते, समाजाला मतदान करण्याचे आवाहन केल्याबद्दल सुशीलकुमार शिंदे व सिद्धाराम म्हेत्रे यांनी मंत्री एम बी पाटील यांचे आभार व्यक्त केले.

प्रारंभी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाळासाहेब शेळके यांनी बैठकी मागील उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे व काशिनाथ भतगुनकी यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!