
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीच्या खर्चात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. त्यांनी आतापर्यंत १५ लाख ७० हजार ९४६ रुपये खर्च केला आहे. भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा खर्च १३ लाख ६२ हजार ६४० रुपये एवढा झाला आहे. निवडणुकीतील खर्चाची पडताळणी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या नोंदी, खर्चाची पडताळणी नुकतीच समितीने केली आहे. प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने कमी कालावधीत जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत.