
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबई अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते.
परिषद मध्ये त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सगे सोयरे याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गी लावतील असा विश्वास नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहर समन्वयक दिलीप कोल्हे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार, तुकाराम मस्के, भाजप नेते आनंत जाधव, इंद्रजीत पवार, सुहास कदम आदी उपस्थित होते.