
सोलापूर : प्रतिनिधी
वडार समाज हा परंपरागत काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभा असलेला समाज असून काँग्रेसने देखील यापूर्वी १७ नगरसेवक देऊन वडार समाजाला न्याय दिला आहे. आजदेखील हा समाज भक्कमपणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून भविष्यात देखील काँग्रेस पक्षाच्याच पाठीशी उभा राहील अश्या प्रकारची घोषणा आज सोलापूर शहरातील विविध भागात राहत असणाऱ्या आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रमुख, माजी नगरसेवक, समाजातील पंच, विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, प्रतिष्ठित मान्यवरांनी आज एकत्र येऊन काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे याना जाहीर पाठिंबा दिला.
सदर बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रदेश प्रतिनिधी CA सुशील बंदपटे, माजी नगरसेवक दत्तू अण्णा बंदपट्टे, माजी नगरसेविका महादेवी अलकुंटे, मनोहर मुधोळकर, विष्णू मुधोळकर, डॅडी दुरलेकर, गजेंद्र निंबाळकर, भारत निंबाळकर, गोपी मुदगल, परशुराम आनंदकर, सिद्धू आनंदकर, ताम्मा भरले, भीमराव धोत्रे, राजाभाऊ कलकेरी, सुरेश धोत्रे महाराज, अशोक यामपुरे, रवी अलकुंटे, दत्ता विटकर, प्रदीप भरले, हेमंत कुमार निंबोळे, अंजलीताई मंगोडेकर, अविराज आनंदकर, मोहन विटकर, राजू लिंबोले, राजू चौगुले, महेश अलकुंटे, श्रीनिवास यमपुरे, बंटी यमपुरे, सुशील कन्नूरे, सुशील कंदलगावकर , संजय यमपुरे, गोपाळ पाथरुट, सदाशिव मुद्दे, पुनाजी भांडेकर, भीमाशंकर बंदपट्टे, संतोष इरकल बंटी पवार, दत्तू अलकुंटे आदी उपस्थित होते.