घोषणा देण्यावरून धनगर बांधव व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यालयाला घेराव घालून धनगरी ढोल वाजवून देण्यात आल्या घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी
सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात रविवारी प्रत्येक तालुक्याच्या आमदार यांच्या निवासस्थानाला घेरावा घालून त्यांची भुमिका काय आहे याबाबत विचारणा केली असता, भाजपाचे पदाधिकारी व धनगर समाज बांधव यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
धनगर समाज बांधव आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या घराला घेरावा घालणार होते. परंतु आमदार कल्याणशेट्टी यांनी विनंती केली की आपण घरी न येता कार्यालयाकडे येण्याची विनंती केली.
आमदार लवकर आले नसल्याने समाज बांधव आमदार यांच्या घरावर घेरावा घालण्यासाठी आग्रही भूमिका घेतली असता भाजपाचे पदाधिकारी हे आमदार आहेत येतील थोडे वेळ थांबा. रात्री उशिरा आले आहेत. आपणास दम नाही का अशा प्रकारचे उत्तर दिल्याने धनगर समाज बांधव आणि भाजपाच्या पदाधिकारी यांच्या मध्ये शाब्दिक चकमक उडाली.
भाजप सोलापूर जिल्हा चिटणीस परमेश्वर यादवाड भाजपा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ननू कोरबु अक्कलकोट शहर अध्यक्ष शिवशरण जोजन व धनगर समाजातील नेते घोषणा देण्यावरून चकमक झाली.
काही वेळाने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आगमन झाले आणि त्यांनी पाठिंब्याचे पञ दिल्याने वातावरण निवळले.