
सोलापूर : प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे जगद्ज्योती महात्मा बसेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाची नियोजन बैठक रविवारी बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरात ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गोपाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वरांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून बैठकीस सुरुवात करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, माजी नगरसेवक विनोद भोसले, वीरेश उंबरजे, सागर हिरेहब्बू , आशितोष वाले, मल्लु पाटील, गणेश साखरे, योगेश जम्मा, प्रवीण दर्गोपाटील, माजी उत्सव अध्यक्ष संदीप दुगाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर प्रसंगी मागच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळात सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वीपणे पार केल्याबद्दल सर्व मंडळांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या बैठकीमध्ये बसवेश्वर जयंती उत्सव साजरी करण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतेश स्वामी व आभार प्रदर्शन मंडळाचे ट्रस्टी शिवराज झुंजे यांनी केले.
जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी होऊन बसवेश्वर जयंती शांततेत व समाज उपयोगी उपक्रमाने साजरी करावी असे आवाहन उत्सव अध्यक्ष सिद्धार्थ सालक्की यांनी केले.
नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे
अध्यक्ष :- सिद्धार्थ सालक्की
उपाध्यक्ष :- सागर हुमनाबादकर, सिद्धाराम नागशेट्टी, समर्थ बिराजदार, दादा गुळसकर
सचिव पदी :- शिवशरण साखरे
कार्याध्यक्ष :- शैलेश वाडकर, शरद गुमटे
सहसचिव :- आकाश माकाई, प्रेम भोगडे
खजिनदार :- समर्थ हटकर
मिरवणूक प्रमुख :- वैभव बिराजदार, रवीकुमार अतनुरे, विकास हिरेमठ
पूजा प्रमुख :- सोमनाथ आवजे, शांतेश स्वामी सहकार्याध्यक्ष :- शुभम हंचनाळे
प्रसिद्धीप्रमुख :- रोहित इटगी, संकेत विभुते.