
सोलापूर : प्रतिनिधी
देशाचा विकास आणि सोलापूरच्या समृद्धीसाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान करण्यासाठी सोलापूर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी केले.
दरम्यान प्रभाग क्रमांक 22 चे कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांचा वाढदिवस नुकताच पार पडला आपल्या वाढदिनी नागेश गायकवाड हे परगावी होते ते रविवारी सोलापुरात आले असता इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं प्रभाग क्रमांक 22 मधील बुवा गल्ली भूषण नगर हनुमान मंदिर उदय विकास प्रशाला समोर लिमयेवाडी येथे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, नागपूर मतदार संघाचे आमदार तथा भाजपा सोलापूर लोकसभा निरीक्षक सुधाकर कोहाळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष पवार, भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड, राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, चंद्रकांत गायकवाड, सूर्यकांत गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक नागेश यांचा वाढदिवसानिमित्त शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार राम सातपुते यांनी नागेश गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी राम सातपुते म्हणाले, सोलापूरच्या समृद्धीसाठी सोलापूरला खूप काही देण्याची इच्छा आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांनी भाजपा ला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे ही निवडणूक देशाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असे आहे. सोलापुरात आयटी पार्क व्हावे असे माझे स्वप्न आहे सोलापूरकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवू, उजनी दुहेरी पाईपलाईन च्या माध्यमातून एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा मानस आहे. सोलापूरकरांनी या रामाला एक संधी द्यावी असेही सातपुते म्हणाले.
किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी प्रभागाच्या विकासासाठी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला असल्याचेही यावेळी आमदार राम सातपुते यांनी किसनभाऊ आणि नागेशअण्णा यांचे तोंड भरून कौतुक केले.
यावेळी विनोद जाधव, मच्छिंद्र गायकवाड, राजू जाधव, कपिल जाधव, माऊली जरग, अमोल लकडे, उमेश जाधव, निलेश कांबळे, संतोष गायकवाड, अमोल जगताप, उमेश जाधव, प्रेम नागेश गायकवाड, शुभम जाधव, सत्यम जाधव,ऋषी येवले प्रथमेश पवार, दिनेश आवटी, माणिक कांबळे, वसंत कांबळे, हुलगप्पा शासम, सचिन राऊत, देवा कोकरे, जितेंद्र दारलू, पकाले वकील आदींची उपस्थिती होती राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रुक्मिणी जाधव, शोभा गायकवाड, लक्ष्मी उर्फ अंजली आठवले, संगीता बिराजदार प्रमिला स्वामी,संगीता गायकवाड, आदींसह प्रभाग क्रमांक 22 मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छा भगवंताची मित्रपरिवार आदींनी परिश्रम घेतले.