
सोलापूर : प्रतिनिधी
42 सोलापूर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख, युवा नेते मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली प्रभाग क्रमांक 25 येथील भारत माता नगर, जय बजरंग नगर, रामलाल नगर, भाग्यश्री पार्क, येथील विविध सोसायटीमध्ये होम टू होम भाजपच्या उमेदवारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला.
यावेळी येथील नागरिकांचा एकच निर्धार पुन्हा मोदी सरकार असा पाहायला मिळाला. याप्रसंगी माजी नगरसेवक सुभाष शेजवाल, महायुतीतील रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, भाजपा युवा मोर्चाचे दक्षिण विधानसभा संघटक विशाल बनसोडे, जय मल्हार संघटनेचे धनप्पा वाडे, विनय गोस्वामी, विशाल शिंपी, समर्थ फणसे, आकाश बनशेट्टी, विकास पवार, सागर वानखडे, राहुल पाचवे, वैभव बडुरे, सिद्धांत बिराजदार, सोमनाथ भिंगे, सिद्धाराम भिंगे, गंगाधर नामतुरे, रजपूत भाभी, आदी प्रभागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.