
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपले वडील सुशीलकुमार शिंदे, आई उज्वला शिंदे यांच्यासह जागृती प्रशालेत मतदानाचा हक्क बजावला.
या सह सोलापूर दक्षिण भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या पत्नी, मुलगा यांच्या समवेत रांगेत थांबून मतदान केले. यावेळी मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती सकाळी सात वाजल्या पासून मतदान सुरू असल्याने उन्हामुळे मतदान सकाळीच करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या सर्वांगीण विकासावर भाष्य करत भाजपवर सडकून टीका केली तर भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी दहा वर्षातील सोलापुरातील भाजपची कामांची माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुनश्च एकदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान केल्याचे सांगितले.