शिक्षिका स्वाती खरवळे यांच्यासह अनेक महिलांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
स्वाभिमानी शिक्षक कर्मचारी महासंघ व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

सोलापूर : प्रतिनिधी
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बापूसाहेब आडसुळ यांच्या वाढदिवसा निमित्ताने शिवस्मारक सभागृह येथे विविध सामाजिक उपक्रमांचा आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सोलापूर येथे विविध क्षेत्रातील महिलाना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले.
या
वेळी आदर्श राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार डॉ भाग्यश्री राठोड, स्वाती खरवळे, सारिका हिरेमठ, ज्योती मडकी, मधुरा बेत, कल्पना हवले, श्वेता पाटील, राजश्री स्वामी, पल्लवी वईटला, अनिता माने, स्वेता सावळे, रूपाली शेंद्रे, वनिता नेवसे यांच्यासह महिलांना बापूसाहेब आडसुळ, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या हस्ते मानाचा फेटा सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार देण्यात आला.
आदर्श राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार देते वेळी त्या शिक्षकांनी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार, त्यांच्या पद्धती, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यां मध्ये शिक्षणाची गोडी वाढवली. यासह सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षकांनी इतर केलेली कामे पाहून त्यांना हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले या पुरस्कारात बहुसंख्येने महिला शिक्षकांनी पुरस्कार घेत महिलांचा वेगळा ठसा निर्माण केला.