सोलापूरक्राईम

तू वेगळ्या जातीची आहेस असे म्हणून हुंड्यासाठी छळ, फिर्यादी पत्नी आणि साक्षीदार पती असून देखील चौघाची निर्दोष मुक्तता

प्रसिद्ध कापड व्यापाऱ्यासह इतर तिघांची हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता : अँड.अभिजित इटकर

सोलापूर : प्रतिनिधी

यातील संशयित नामे सागर शिवाजीराव जवळकर, सरिता सागर जवळकर, आशिष सागर जवळकर, सुप्रिया आशिष जवळकर सर्व रा. भवानी पेठ, सोलापूर यांची हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी मा. न्यायाधीश पारशेट्टी मॅडम यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, फिर्यादी व यातील साक्षीदार नामे आदित्य सागर जवळकर यांचा विवाह २२ जुलै २०११ रोजी नांदेड येथे झालेला होता. विवाहानंतर फिर्यादी सासरी नांदायला गेली व तेथे नांदत असताना तिचा नवरा कामाच्या ठिकाणी गेला असता यातील संशयित नामे सागर शिवाजीराव जवळकर, सरिता सागर जवळकर, आशिष सागर जवळकर, सुप्रिया आशिष जवळकर सर्व रा. भवानी पेठ, सोलापूर यांनी फिर्यादीस तू वेगळ्या जातीची आहेस तू आमच्या मुलाला फसवलीस असे म्हणून नेहमी शिवीगाळ दमदाटी करत होते. आरोपी क्र. ३ हा दारू पिऊन नशेत तू वेगळ्या जातीची आहेस, तू गरीब घरची आहेस, तू मुद्दामहून माझा भाऊ आदित्य याच्याशी पैशासाठी लग्न केले आहेस. तुला जीवे मारून टाकतो असे म्हणून धमकी देत असे. तसेच घरातील सर्व कामे फिर्यादीलाच करायला लावून तू प्रेमविवाह केलेला आहेस तसेच लग्नात तुझ्या भावाने कोणत्याही प्रकारचे संसारुपयोगी साहित्य अथवा हुंडा म्हणून सोने अगर पैसे दिलेले नाही. तू भावाकडून रोख रक्कम व १० तोळे सोने घेऊन ये नाहीतर घरात राहू नकोस म्हणून मारहाण केली आहे. अश्या आशयाची फिर्याद विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दाखल केलेली होती. सदर कामी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले.

अत्यंत दुर्मिळ केस कारण सदर केस मध्ये फिर्यादीचा नवरा आरोपी नसून साक्षीदार होता व त्याने स्वतःच्या आई वडील व भावाविरुद्ध साक्ष दिली. सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी व सदर केस चे तपासाधिकारी हे होते.

सदर खटल्यात आरोपी च्या वकिलांनी घेतलेली फिर्यादीची उलटतपासणी सदर खटल्यास कलाटणी देणारी ठरली. सदर फिर्यादी ने उलटतपासणीमध्ये अनेक महत्वाच्या बाबी मान्य केल्या त्या म्हणजे सदर फिर्यादीने सदर संशयितांविरुद्ध पोलीस मुख्यालयात तसेच पोलीस स्टेशन मध्ये अनेक तक्रारी अर्ज दाखल केले होते पण त्या तक्रारी अर्जामध्ये फिर्यादी ने तिला सदर संशयितांनी हुंड्यासाठी छळ केला अशी बाब कुठेच नमूद केलेली नव्हती. तसेच फिर्यादी चा नवरा म्हणजे संशयित नं. १ यांचा मुलगा व संशयितांमध्ये अनेक प्रॉपर्टी बद्दलचे दावे मे. कोर्टामध्ये प्रलंबित असल्याची बाब फिर्यादीने मान्य केली. तसेच फिर्यादीच्या सासऱ्यांनी सदर फिर्यादीच्या नवऱ्यास नेहरू नगर येथे एक मोठे कपड्याचे दुकान थाटून दिलेले होते व त्याचा सगळा खर्च संशयितांनी केलेला होता.

सदर संशयिताच्या वकिलांनी युक्तिवाद करतेवेळेस अनेक महत्वाचे मुद्दे मांडले ते अश्याप्रकारे कि सदर फिर्यादीस जर संशयितांकडून हुंड्यासाठी छळ होत होता तर सदरची बाब त्यांनी त्यांच्या पोलिसांकडे दिलेल्या अनेक तक्रारी अर्जांमध्ये नमूद करणे गरजेचे होते पण ते केलेले नाही व असा काही हुंड्यासाठी छळ झालेलाच नव्हता त्यामुळेच हि बाब त्यामध्ये नमूद नाही. तसेच फिर्यादी चा नवरा व संशयित यांच्यामध्ये प्रॉपर्टी चा वाद असल्यामुळे दबावतंत्र म्हणून सदरची खोटी फिर्याद दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर बाबींचा विचार करून यातील संशयित आरोपी नामे सागर शिवाजीराव जवळकर, सरिता सागर जवळकर, आशिष सागर जवळकर, सुप्रिया आशिष जवळकर सर्व रा. भवानी पेठ, सोलापूर यांची मा. न्यायाधीश पारशेट्टी मॅडम यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपींतर्फे अँड. अभिजित इटकर, अँड. राम शिंदे, अँड. संतोष आवळे, अँड. फैयाज शेख, अँड. सुमित लवटे, अँड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!