
सोलापूर : प्रतिनिधी
जगद्ज्योती महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती महाराज चौक येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांच्या जयंती मिरवणूक सुरवात करण्यात आली.
श्री जगद्ज्योती महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांची पालखी मिरवणूक माजी राज्यमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते पूजा करून मिरवणुक काढण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजयुमो अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, माजी सभागृह नेता संजय कोळी, शिवानंद पाटील, प्रसाद कुलकर्णी, राजकुमार पाटील, मध्यवर्ती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील, शिवराज झुंजे, मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सिद्धार्थ सालक्की.
त्यांच्या सह बिपिन धुम्मा , माजी नगरसेवक नागेश भोगडे, विरेश उबरंजे मल्लु पाटील, सागर हुबनाबादकर, जगदीश व्होड्रंव, सिध्दराम नागशेट्टी, राहुल शाबदे, समर्थ व्हटकर, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.