
सोलापूर : प्रतिनिधी
बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीने सालाबाद प्रमाणे मातृशक्तीच्या हस्ते बसवेश्वर सर्कल कोतंम चौक येथील श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं महापूजेचे आयोजन करण्यात आलं होतं. तत्पूर्वी सर्कलच्या सभोवताली भव्यदिव्य असे रांगोळी काढून कार्यक्रमाची सुरवात झाली. या प्रसंगी शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रसंगी राजश्री थळंगे, दिपा बाबानगरे, शिला थळंगे, अनुष्का थळांगे, रश्मी थळंगे, श्रीदेवी पावले, जगदेवी हिंगमिरे, आरती सारवाड, अश्विनी महाले, नंदिनी धनुरे, राणी पदमगोंडा, आरती पिसे या सह शंकरलिंग महिला भजनी मंडळ, बसव नगर, बसवेश्वर सर्कल महिला मंडळ आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बसवेश्वर सर्कलचे संस्थापक भीमाशंकर पदमगोंडा, गुरुराज पदमगोंडा, परमेश्वर ख्याडे, आशिष दुलंगे, सागर अतनुरे, सतीश पारेली, अक्षय अंजीखाने, यातीराज होनमाने, विकी चाकोते, अक्षय बिद्री, सचिन कुलकर्णी, चन्नेश ईडी, संदीप महाले, महेश जेऊर, बसवराज चडचन, चिदानंद बगले, जगदीश ख्याडे, जगदीश ख्याडे आदींनी परिश्रम घेतले.