शंभूराजे, कवी कलश यांच्या मैत्रीचा देखावा आणि श्रीमंतयोगी ची भव्य मिरवणूक पाहण्यासाठी हजारो सोलापूरकर उपस्थित
कवी कलशांची "हो राजन, राजन तूम हो सांचे खूब लढे हो जंग, देखं तुम्हारा तेज, तखत त्यजत औरगं" मैत्री असावी तर अशी : अजिंक्यराणा पाटील (युवा नेते)

सोलापूर : प्रतिनिधी
श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने मागील 14 वर्षा पासून छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रारंभीचे 10 वर्ष स्थापना करून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. मागील 4 वर्षापासून भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे.
यंदाच्या वर्षी देखाव्याचे प्रमुख आकर्षण होते छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यातील मैत्री आणि संभाषण. प्रति वर्षाप्रमाणे यंदाही भव्य देखावा काढत मोठ्या उत्साहात डॉल्बीच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक चार हुतात्मा पुतळा येथून छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावर निघाली. मिरवणूक पाहण्यासाठी सोलापूर शहरातील हजारो नागरिक उपस्थित होते.
मिरवणुकीची सुरुवात प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, युवा नेते अजिंक्यराणा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, मंडळाचे संस्थापक अजिंक्य पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करण्यात आले.
श्रीमंतयोगी प्रतिष्ठान संस्थापक अजिंक्य पाटील, आधारस्तंभ माजी आमदार राजन पाटील, मार्गदर्शक बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, उत्सव अध्यक्ष नितीन चव्हाण, उपाध्यक्ष संजय रेड्डी, रोहित दिंडोरे, बाळासाहेब माने, सचिव कुणाल मोरे, मुन्ना पाटील, खजिनदार संकेत शिंदे
आणि यश मस्के, समर्थ बिडकर, अभिषेक गुरव, श्रीनाथ कुरर्शेट्टी, नाथा पवार, नाना देशमुख, रोहन पवार, श्रेयस कुरले, विकास लोंढे, अनिकेत लोंढे, प्रशांत उरचनकर, सोहम साळुंखे, निखिल थोरवत, अनिल कांबळे, हर्ष पाटिल आणि श्रीमंतयोगी प्रतिष्ठान, अजिंक्य पाटील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कला सृष्टी डेकोरेटर चे अनिल इंगळे यांनी या देखाव्याचे डेकोरेशन केले होते.