15 हजार शिवशंभू भक्तांना शिवमुद्रा परीवाराच्या वतीनं शिवभोजन, स्थानिक आणि इतर जिल्ह्यातील शिवभक्तांनी आयोजकांचे केले कौतुक
पुढील वर्षी 21 हजार शिवशंभू भक्तांना शिव भोजन देणार : गणेश देवकते (संस्थापक, शिवमुद्रा परिवार)

सोलापूर : प्रतिनिधी
शिवमुद्रा परिवाराच्या वतीने अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज जयंती सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मागील वर्षापासून त्यांनी स्थानिक आणि पारगावच्या आलेल्या शिव भक्तांना जेवणाची सोय व्हावी यासाठी शिव भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले.
मागील वर्षी जवळपास 11 हजार शिवशंभू भक्तांनी शिव भोजनाचा आस्वाद घेतला तर यंदाच्या वर्षी 15 हजार शिवशंभू भक्तांनी शिवभोजनाचा आस्वाद घेतल्याची माहिती शिवमुद्रा परिवाराचे संस्थापक गणेश देवकते यांनी दिली.
या शिव भोजनाची सुरुवात माजी महापौर पद्माकर काळे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि मान्यवरांच्या हस्ते भोजनाचे वाटप करून सुरुवात करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी शिवमुद्रा परिवाराचे संस्थापक गणेश देवकते, आधारस्तंभ अर्जुन सोनवणे, बाबुभाई बनसोडे, पिंटू चव्हाण, महेश जगदाळे.
उत्सव अध्यक्ष मयुर नवगिरे, निलेश शिंदे, सुर्यकांत शेळके, सुहास चाबुकस्वार, संभाजी साळुंखे, विजय सोनटक्के, अनिल शिंदे, नानासाहेब काळे व जयजित गादेकर मित्र परीवार, पत्रा तालीम युवक मंडळ यांनी परिश्रम घेतले.