
सोलापूर : प्रतिनिधी (मोहोळ)
मोहोळ येथील श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कै. दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ अविनाश गोडसे आणि त्यांचे बंधू सतिश गोडसे यांच्या वतीने दरवर्षी भक्तांसाठी अनेक प्रकारे सोय करण्यात येते.
यंदाच्या वर्षीही श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कै. दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा प्रशासन अधिकारी अविनाश दत्तात्रय गोडसे आणि मुंबई भाईंदर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश दत्तात्रय गोडसे यांनी यात्रेमध्ये आलेल्या भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाणी बॉटल ची सोय केली. कडक उन्हामुळे नागरिकांना दिवसभर ऊणाचा त्रास होतो त्यात पिण्यास पाणी लवकर मिळत नाही हे लक्षात घेऊन स्थानिक आणि पर जिल्ह्यातून आलेल्या भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली या उपक्रमाचे भक्तांनी कौतुक केले.
पाणी बॉटल वाटप प्रसंगी मोहोळ येथील पंचायत समिती गट विकास अधिकारी आनंद मिरगणे, मोहोळ पंचायत समिती माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, बप्पा देशमुख, मोहोळ येथील कन्या प्रशालेचे प्राचार्य सुधीर गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यांत आले.
यावेळी सुनिल गायकवाड, कारभारी गायकवाड, अविनाश गोडसे, आसावरी गोडसे, आदेश गोडसे, श्लोक गोडसे, जान्हव्ही गोडसे, विभावरी गोडसे, माहेश्वरी गोडसे, वैष्णवी चव्हाण, शिवदत्त चव्हाण, सोमेश्यर शेंडे, राजेश देशपांडे, प्रसाद देवळे, विलास पाटील, दिगंबर व्होनमाने, बाहुबली खiडेकर, आदि उपस्थित होते. यात्रेतील स्थानिक आणि पर जिल्ह्यातून आलेल्या भाविक भक्तांनी गोडसे बंधूंनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.