
सोलापूर : प्रतिनिधी
माढा येथील प्रविण कांबळे यांच्या फिर्यादी वरून दि ११/०४/२०२४ रोजी ते आजतागायत शासकीय विश्रामगृह येथे मंद्रुप येथील विदयालय येथे यातील नमुद आरोपी १) अनमोल केवटे २) महेश कांबळे ३) आसिफ शेख ४) नागेश बिराजदार ५) बंदेनवाज शेख रा- मंद्रुप जि. सोलापूर मजकूर यांनी फिर्यादीचे समती शिवाय फिर्यादीचे डान्स बार मधील पोरी सोबत नाचताना चा फोटो व व्हिडीओ काढलेले आहेत. तु आम्हास 2 लाख रू दे नाहीतर आम्ही तुझे व्हिडीओ व्हायरल करू असे धमकी दिली.
तसेच पैसे न दिल्याने सदरचा व्हिडीओ संस्थेचा पदाधिकाऱ्याना पाठवत आहे. तसेच संतोष पाटील महाविदयालय यांचे मेलवर ईमेलव्दारे प्राध्यापक कांबळे त्याच्या विरूध्दात कॉलेज संस्था विदयापीठ व उच्च शिक्षण विभाग पुणे यांचेकडे मेलव्दारे तक्रारी अर्ज दाखल असे स्टेटस ठेवून मध्यस्थी मार्फत फिर्यादीस पैश्याची मागणी करीत होते. तसेच सदर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत आहे. याचा सदर बाजार पोलीस स्टेशनचे तपास API व्हट्टे हे करीत आहेत.