होमगार्डचा कोणी वाली आहे का.? बंदोबस्त करून थकलेल्या होमगार्डचा सवाल, बंदोबस्तात जवानांचे हाल
होमगार्ड जवानांमध्ये निवडणूक बंदोबस्त मध्ये निराशाचे वातावरण

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरात परीक्षा बंदोबस्त, एप्रिल महिन्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, निवडणुक, कायदा सुव्यवस्थेचा बंदोबस्त मध्ये होमगार्ड जवानानी चांगला बंदोबस्त केला. होमगार्ड जवानांचे काही मानधन रखडल्यामुळे येणारा निवडणुक बंदोबस्त बिगर मानधना अभावी करायची पाळी होमगार्ड जवान वर आली असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर जवानाने दिली.
होमगार्ड जवान हा आपल्या कुटुंबाला सोडून दुसऱ्या ठिकाणी काम करून उपजीविका चालवतो. कायदा सुव्यवस्था राखणे, निवडणूक बंदोबस्त करतो, होमगार्ड जवान यांना परगावी निवडणूक बंदोबस्त साठी पाठवण्यात आले असून बिगर मानधन अभावी बंदोबस्त करायचं पाळी होमगार्ड जवानांवर येणार आहे. आता होमगार्ड जवान ४ मे २०२४ पासून निवडणूक बंदोबस्त सोलापूर मध्ये व परगावी पुणे मुंबई येथे बिन मानधन अभावी करत आहेत.
परगावी होमगार्ड जवानाचे प्रचंड हाल होत आहेत. १० मे २०२४ पासून पुणे निवडणूक बंदोबस्त तसेच आता पुणे वरून मुबंई निवडणूक बंदोबस्त साठी होमगार्ड यांना नेमण्यात आले. पुणे येथे होमगार्ड यांचे प्रचंड हाल झाले. सध्या मुंबई येथे बंदोबस्त सुरू असून येथील बंदोबस्त संपण्याच्या अगोदर मागील थकीत आणि चालू सर्व मानधन मिळावे अशी होमगार्ड जवानांची मागणी आहे. याबद्दल जिल्हा समादेशक यांनी लक्ष घालून होमगार्ड जवानाचे रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावे अशी समस्त सोलापुर जिल्हातील शहरातील होमगार्डची मागणी आहे.