सोलापूर शहरवासीयांना स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा करा अन्यथा जिल्हाधिकारी महोदय खुर्ची खाली करा : सुरेश पाटिल
खासदारकी तो झाकी है, आमदारकी और नगरसेवक की इलेक्शन अभी बाकी है : आण्णाचा इशारा

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर व प्रभाग 3 भवानी पेठ घोंगडे वस्ती जोडभावी पेठ आणि इतर सर्व ठिकाणी काल पासुन खुप मोठा प्रमाणात पाणी टंचाई होत असून या कडे कुणाचाही लक्ष नाही. प्रशासन राजवट लागू असल्याने लोकप्रतिनिधी गप्प का आहेत ? पुन्हा निवडणुकीत उभारणार नाहीत का ? समाज कार्य करणार नाहीत का ? आपण सर्वजण प्रत्येक निवडणुकीत म्हणजे खासदार व आमदार तसेच नगरसेवक इलेक्शन मध्ये सर्व प्रकारचे सोयी सुविधा देतो म्हणून जाहीरनाम्यात प्रसिद्धी करतात मात्र प्रत्यक्षात कुठल्यही प्रकारची कामे दिसत नाही.
सध्या सोलापूर शहरांमध्ये अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या झालेली आहे याकडे काहीतरी उपाय योजना करावी अन्यथा खासदार, आमदार यांनी राजीनामा द्या नाही तर पिण्याची पाणी द्या. आम्ही वेळ पडल्यास जनतेसाठी पक्ष बाजूला ठेवून रस्त्यावर उतरणार आहोत.
आजच्या आज पाणी पुरवठा सुरळीत करा सहा दिवसाआड सात दिवसाआड पाणीपुरवठा करू नका. जेणे करून नागरीकांना पाण्यासाठी त्रास होणार नाही याची प्रशासनाने त्वरीत लक्ष घालून पाणी पुरवठा सुरळीत करा. पाणीपुरवठा कमी दाबाने सोडू नका, अनेक ठिकाणी पाणी पिवळसर येत आहे त्यामुळे नागरिकांना आरोग्याची धोका निर्माण होत असते.
जिल्हाधिकारी महोदय तुम्ही महापालिका आयुक्त आणि संबधित पाणी पुरवठा अधिकारी झोन अधिकारी प्रशासन प्रमुख यांना घरी पाठवा. असे नाही झाल्यास मतदार राजे व जनता जनार्दन सर्व लोकप्रतिनिधीना घरी बसवावे लागेल याची नोंद घ्या. निवडणुकीत घरोघरी फिरणारे बाहेर पडा, चला महानगरपालिका कडे जाब विचारू, आंदोलन करू, मोर्चा काढून काळे झेंडा दाखवू, वेळ प्रसंगी आम्ही सोलापूरमहानगर पालिकेला कुलूप लावून बंद करू असे म्हणत सुरेश पाटिल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांनी पाण्याची योग्य ती नियोजन नाही केल्यास आपल्याला घरी बसवण्यास भाग पाडू. असेही पालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटिल म्हणाले.