महाराष्ट्रसोलापूर

मोहोळ येथील टाकळी सिकंदर स्मशानभूमीत जादूटोणा, करणीचा प्रकार, दोघा विरोधात गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी

मुलाला शिव्या, शाप का दिल्या म्हणून जाब विचारल्याच्या कारणावरून तसेच गावातील इतर लोकांवर असलेला राग मनात धरून फिर्यादीसह गावातील लोकांचे फोटो वापरून त्या फोटोवर त्यांचे धंदे चालू नयेत, त्यांच्या टपरीचे गिऱ्हाईक बंद होऊन ते गिऱ्हाईक स्वतःच्या टपरीकडे यावे, असे लिहून ते फोटो जाळून एका टोपलीत भरले. त्यात मांस व जादूटोण्याच्या इतर वस्तू ठेवून अनिष्ट, अघोरी, करणी, धरणी, जादूटोणा केल्याचा प्रकार बुधवारी १५ मे रात्री ९ च्या सुमारास मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील स्मशानभूमीत उघडकीस आला.

याबाबची तक्रार एका महिलेने मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये मनिषा बबन खांडेकर व ज्ञानेश्वर लोंढे, दोघेही रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ यांच्यावर गुरुवारी १६ मे रोजी गुन्हा दाखल केला.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा सिद्धेश्वर परबतराव, वय ४० कुटुंबासमवेत टाकळी सिकंदर येथे राहतात. सीमा यांच्या मुलाने मनीषा खांडेकर हिला दारूच्या नशेत शिव्या दिल्यानंतर भांडण झाले होते. त्यावेळी खांडेकर हिने त्याला शिव्या, शाप दिला होता. दरम्यान, सीमा यांच्या मुलाने दारूच्या नशेत गळफास घेऊन जीवन संपविले होते. त्यानंतर सीमा यांनी मनिषा हिला तू जादूटोणा व करणी-धरणी केल्यामुळेच माझ्या मुलाने जीवन संपविले. असे म्हणत जाब विचारला होता. त्यातून त्यांच्यात वादही झाला होता.

ॲड. गोविंद पाटील (महाराष्ट्र अंनिस, राज्य सदस्य)

लोकांच्या अशिक्षितपणाचा आणि श्रध्देचा फायदा उठवणारे बुवा, बाबा, मांत्रिक, तांत्रिकांचा सर्व्हे पोलिसांनी करून त्यांचे प्रबोधन करावे. जादूटोणा, करणी – भानामती असा कोणताही प्रकार नसतो. त्यातून होणारी लोकांची लूट थांबवावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!