श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे दत्तात्रय देशमुख यांच्या विश्वस्त मंडळाला मिळाला न्याय : उदय वैद्य
सोलापूर धर्मादाय कोर्टाने मंजूर केलेला बदल अहवाल पुणे येथील धर्मादाय कोर्टाने कायम ठेवत विरोधकांचे तीनही अपील फेटाळले

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर व परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांचे सम्राट चौक येथे मंदिर आहे. श्री. सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर समितीचे कामकाज कायदेशीररित्या व व्यवस्थित चालवण्यासाठी प. पू. श्री. दिगंबर पांडुरंग इनामदार गुरुजी यांनी १९७० साली प्रामुख्याने हा न्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदवण्या करता महत्त्वाची भूमिका निभावली होती. दरवर्षी श्री सदुगुरु प्रभाकर स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव माघ महिन्यात तीन दिवस चालतो. या उत्सवात लाखो भाविक उपस्थित राहुन मोठ्या उत्साहाने हा उत्सव पार पाडत असतात.
ट्रस्टमध्ये कधीही, कोणतेही वाद नव्हते व आजही नाहीत. असे असतानाही विश्वस्त मंडळाच्या कायदेशीर बदल अहवालांना संजय अवताडे, राहुल कनकी, बाळासाहेब शिंदे, बालाजी पुट्टा, रामचंद्र जगताप व इतरांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात हरकती उपस्थित केल्या. इतकेच नव्हे तर हे तक्रारदार स्वतः संस्थेचे विश्वस्त असल्याचा दर्शविणारा बोगस, खोटा व बनावट बदल अहवाल दाखल केला व मे, धर्मादाय कोर्टाने फेटाळला. अशाच एका या प्रकरणात संजय अवताडेच्या गैर साथीदारांनी संस्थेचे विश्वस्त म्हणून कामकाज पाहणारे विद्यमान मुख्य विश्वस्त दत्तात्रय देशमुख, रामभाऊ अंबुरे, बाळकृष्ण शिंगाडे, वसंत बंडगर व उदय वैद्य यांच्या विरुद्ध कामकाज पाहण्यास मनाई करावी असे प्रकरण पुणे येथील मे धर्मादाय सह आयुक्त यांच्या कडे दाखल केले होते. सदरचे प्रकरण देखील तत्कालीन मे. धर्मादाय सह आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी विद्यमान संस्थेचे विश्वस्त दत्तात्रय देशमुख व त्यांच्या विश्वस्त मंडळाचे कामकाज कायदेशीर चालत असल्याची नोंद करत अशा प्रकारे त्यांना कामकाजापासून दूर करू शकत नाही असा निर्वाळा देत फेटाळून लावले होते. तसेच संजय आवताडे व त्याच्या गैरसाथीदारांनी मंदिराच्या न्यासाच्या नावाने बनावट आणी खोटे लेटरपॅड व खोटे शिक्के तयार करून धर्मादाय आयुक्त कार्यालय, पोलिसांची, न्यासाची मंदिराची फसवणुक केल्यामुळे संजय आवताडे व त्याच्या गैर साथीदारांवर फौजदारी कोर्टात आरोप निश्चिती झालेली आहे.
“न्यासाचे विद्यमान विश्वस्त हे न्यासाच्या घटने प्रमाणे नियमित कामकाज करत आहेत. तसेच व्यवस्थापन व कारभारही सुरळीत सुरु असल्याने कामकाजात हस्तक्षेप करता येत नाही असा निर्वाळाही मे. जॉईंट चॅरिटी कमिशनर राहुल मामू यांच्या कोर्टाने आपल्या निकाल पत्रात दिला आहे.”
कायदेशीररित्या अधिकृत ट्रस्टी असल्यामुळेच सदर मंदिर ट्रस्टचे विद्यमान मुख्य विश्वस्त दत्तात्रय निवृती देशमुख, रामभाऊ तिप्पन्ना अंबुरे, बाळकृष्ण लिंबाजी शिंगाडे, वसंत शेकाबा बंडगर व उदय अरुण वैद्य यांच्या विश्वस्त मंडळाचे व परंपरेने आलेल्या पूर्वीच्या विश्वस्त मंडळाचे धर्मादाय उप आयुक्त सोलापूर यांनी बदल अहवाल क्र. २९७/२०१५ व ७९८/२०१५ दि. ७/११/२०१९ रोजी मंजूर केलेले आहेत. सदरच्या मंजूर बदल अहवाला विरुद्ध पुणे येथील मे. जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्या कोर्टात संजय अवताडे याने अपील केले होते. त्यावर सुनावणी होऊन खालील कोर्टाने दोन्ही मंजूर केलेले बदल अहवाल राहुल मामू यांच्या कोटनि निर्णय देत कायम ठेवला आहे. तसेच या प्रकरणी संजय अवताडे याने दाखल केलेले दोन्ही अपील क्र. ०५/२०२० व ०६/२०२० पुणे येथील मे. जॉईंट चॅरिटी कमिशनर राहुल मामू यांच्या कोटनि फेटाळले.
या प्रकरणी पुणे धर्मादाय आयुक्त कोर्टात झालेल्या कामकाजात श्री. सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात काम करणारे प्रसिद्ध विधीज्ञ अंबादास राजय्या रायनी यांनी तर संजय अवताडे याच्या वतीने एड. पृथ्वीराज देशमुखांनी काम पाहिले.